तुरळचा नीरज इनामदार जाणार ‘नासा’ भेटीसाठी अमेरिकेला!

‘नासा’सह इस्रो भेटीसाठी संगमेश्वर तालुक्यातील पटकावला प्रथम क्रमांक

देवरूख (सुरेश सप्रे) : संगमेश्वर तुरळ सुवरेवाडी या ग्रामीण भागातील मराठी शाळेचा विद्यार्थी नीरज मनोज इनामदारने इस्त्रो /नासा भेटीसाठी तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त करत अमेरिकेला प्रयाण करणार आहे. त्याच्या या निवडीमुळे ग्रामीण भागातील गुणवत्ता भारत विद्यार्थ्यांमध्ये नीरजने स्थान पटकावले आहे


संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथील विद्यार्थी कु. नीरज मनोज इनामदार हिची ईसरो (बेंगलोर) व नासा (अमेरीका) भेटी करीता रत्नागिरी जिल्ह्यातून निवड झाल्याबद्दल समस्त जिल्ह्यातून कौतुक होत आहे. नीरज हा पुर्ण प्राथमिक मराठी शाळा तुरळ सुवरेवाडी ५ वी इयत्ता मध्ये शिकत असुन शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत “जाणू विज्ञान अनुभवू विज्ञान”नासा (NASA) आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्र (अमेरीका) व (ISRO) भारतीय अवकाश संशोधन केंद्र (बेंगलोर) भेट चाळणी परीक्षा उपक्रम राबविण्यात आला. या परीक्षेत संगमेश्वर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत तुरळच्या निरज इनामदार याची (बेंगलोर) व नासा (अमेरिका) भेटी करीता रत्नागिरी जिल्ह्यातुन निवड करण्यात आली आहे. त्याला शाळेतील शिक्षक संदीप कुंभार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.


त्याच्या उत्तुंग अशाबद्दल तुरळ गावात शाळेच्या विद्यमाने गुणगौरव व कौतुक समारंभ मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.त्या वेळेस विस्तार अधिकारी विनायक पाध्ये. केंद्रप्रमुख धुळप. मुख्याध्यापिका सौ. दुर्गा भोजने तसेच सर्व शिक्षक वृंद व पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE