उलवेतील दोन शाखा प्रमुखांचा उद्धव ठाकरे सेनेला राजीनामा

बाळासाहेबांची शिवसेना पक्षात पक्षप्रवेश

उरण दि. 5 (विठ्ठल ममताबादे) दिवसेंदिवस बाळासाहेंबाची शिवसेना या पक्षाला जनतेतून उत्तम प्रतिसाद मिळत असून उरण विधानसभा मतदार संघात बाळासाहेबांची शिवसेना पक्षात अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करीत आहेत. उरण विधानसभा मतदार संघात बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे विधानसभा संघटक कृष्णा पाटील यांच्या विशेष प्रयत्नांनी अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला आहे. उलवे मधील वहाळ ग्रामपंचायत मधील वहाळ गावचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखा प्रमुख सुधीर किसन घरत (वहाळ ) यांनी उद्धव सेनेला सोडचिट्ठी देऊन बाळासाहेबांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. त्यांची बाळासाहेबाची शिवसेना पक्षाचे वहाळ गावचे शाखा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखा प्रमुख राकेश वेदांते यांनीही उद्धव सेनेला सोडचिट्टी देत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश केला. राकेश वेदांते यांची उलवे सेक्टर 18 शाखा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. उत्तर रायगड जिल्हा प्रमुख आमदार महेंद्र थोरवे यांनी नियुक्ती पत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या पक्ष प्रवेश वेळी उरण विधानसभा संघटक कृष्णा पाटील, उलवे शहर अध्यक्ष प्रभाकर पाटील आदी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE