मानवी वस्तीत शिरलेल्या अजगराला सर्पमित्रांनी नैसर्गिक अधिवासात सोडले

उरण (विठ्ठल ममताबादे ) : रात्रीच्या वेळी पनवेल तालुक्यातील दापोली पारगाव येथे राहणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने दारूच्या नशेत अजगराला पकडून त्याचा खेळ करत असताना तो आढळला. यावेळी तेथे उपस्थित असलेले प्रथमेश पाटील यांनी सावधगिरी बाळगत केअर ऑफ नेचर संस्थेचे सर्पमित्र पनवेल विभागप्रमुख साजन सुनील वास्कर, कुंडेवहाळ शाखा प्रमुख स्वामी वास्कर यांना कॉल करून बोलावण्यात आले. त्यांनी तो अजगर जातीचा साप पकडून वन विभागाचे अधिकारी सय्यद मुबारक यांच्या स्वाधीन करून त्यांच्या उपस्थितीत अजगराला जंगलामध्ये सोडून त्याला जीवदान दिले.

साजन वास्कर, स्वामी वास्कर हे सर्पमित्र असून त्यांनी आजपर्यंत अनेक मुक्या जीवांना जीवनदान दिले आहे. मानवी वस्तीत घुसलेल्या अजगराला जीवनदान दिल्याने साजन वास्कर व स्वामी वास्कर यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE