कामांचे श्रेय लाटून जनतेची फसवणूक करू नये

न. पं. सत्ताधाऱ्यांना राष्ट्रवादीचा इशारा

देवरूख (सुरेश सप्रे) : महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांची आ. शेखर निकम यांच्या पाठपुराव्याने कामाची स्थगिती उठवली म्हणूनच न. पं. ला कोट्यवधीचा निधी मिळाला. फुकाचा टेंभा मिरवून जनतेची दिशाभूल करू नये, असा टोला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष हनिफ हरचिरकर यांनी लगावला आहे.

ठोक निधीतून फडणवीस सरकारने नगर पंचायतीस १ कोटी ३० लाख दिले, हे म्हणणे म्हणजे ज्या लोकप्रतिनिधींनी पक्षीय राजकारण न करता जनतेच्या अडचणी लक्षात घेत विकास करावा म्हणूनच पाठपुरावा करून निधी आणला हि माहीत असतानाही आपल्या राजकीय फायदेसाठी त्यांना कमी लेखणेचा प्रकार कुणी हि करू नये. असा घाणाघात हि शहर अध्यक्ष हनिफ हरचिरकर यांनी केला.
कुठलाही निधी कुणी व कसा मंजूर केला तो निधी कुठल्यातून आला व त्यासाठी लोकप्रतिनिधींनी काय केले.. हे पाहूनच खातरजमा करून नंतर क्रेडीट घ्यावे. कोणीतरी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आमच्यामुळे कामे मंजूर झाली हे पूर्णत: चुकीचे आहे.

२०२१-२२ च्या आर्थिक वर्षात कामे मंजूर आहेत. तसा आम. शेखर निकम यांनीच लोकप्रतिनिधी म्हणून राजकारण न करता पत्रव्यवहार व पाठपुरावा करूनच कामे विविध निधीतून मंजूर करून घेतली तीच कामे टेंडर ला येतात.. आम. निकमांना देवरूख नगर पंचायतीची विविध कामे महा विकास आघाडीच्या सरकारचे काळात अर्थमंत्री अजित पवारांकडे पाठपुरावा करूनच कामे बजेटमधे आली.. सरकार बदलल्याने अनेक कामांना स्थगिती दिली गेली. त्यातील ज्या कामांचे कार्यारंभ आदेश दिले ती कामे सुरू करावीत असेच नविन सरकारने आदेश दिल्याने काही काम सुरू झाली.. बाकीच्या कामांना मंजुरी असून कार्यारंभ आदेश नसल्याने फडविस सरकारने ती स्थगित होती. ती उठविणेसाठी आम. निकम यांनी राजकारण न करता लोकप्रतिनिधी म्हणून आपली जनतेशी असलेल्या बांधिलकीतून नविन सरकारमधील संबधीत मंत्र्यांनकडे पाठपुरावा केला. म्हणूनच स्थगिती उठवून त्या कामांना पुर्वी मंजूर असलेला निधी दिला हि वस्तूस्थिती आहे.. तेव्हा आपले सरकार आले म्हणजे नुसती निवेदने देवून निधी मिळत नसतो. काम सुरू वा मंजूर झाले की असे काही मग आमचेमुळे झाले अस जाहीर करून क्रेडीट घेतात. ते लोकप्रतिनिधी वा संघटना वा पक्ष कोणी असोत.. या अशा बातम्या देताना सर्व माहिती घेणे गरजेचे आहे, असा सल्लाही हरचिरकर यांनी दिला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE