शिर्डी हायवेवर बस ट्रक अपघातात दहा ठार

मुंबई : कन्नूज -शिर्डी महामार्गावर आज भाविकांना घेऊन जाणारी बस तसेच ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दहा भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. देवतांमध्ये सातपुरुष तर तीन महिलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

भरधाव ट्रकवर शिर्डीला भाविकांना घेऊन जाणारे बस आदळल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात सुमारे दहा जणांचा मृत्यू झाला असून जखमींना नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची तीव्रता पाहता या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE