रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणारी तिरुअनंतपुरम ते वेरावल ही साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक 23 जानेवारी पासून तिरुअनंतपुरम ते अहमदाबाद दरम्यान विद्युत शक्तीवर धावणार आहे.

कोकण रेल्वेमार्गे धावणारी एर्नाकुलम – ओखा एक्सप्रेस दिनांक 20 जानेवारीपासून विद्युत इंजिनवर धावू लागली आहे. याचबरोबर तिरुअनंतपुरम सेंट्रल ते वेरावल, नागरकोईल- गांधीधाम तसेच एर्नाकुलम ते निजामुद्दीन दरम्यान धावणारी नियमित एक्सप्रेस गाडी अशा चार एक्सप्रेस गाड्या आता विद्युत इंजिन सहज चालवल्या जाणार आहेत.














