‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमांतर्गत संगमेश्वरात पैसा फंडमध्ये चित्रकला स्पर्धा

७३ विद्यार्थ्यांचा सहभाग ; पाच शाळांचा समावेश

संगमेश्वर : परीक्षा पे चर्चा पर्व ६ या उपक्रमांतर्गत शिक्षण आयुक्त, पुणे यांच्या परीपत्रकानुसार २५ जानेवारी रोजी राज्यभर इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन पंचायत समिती संगमेश्वरच्या शिक्षण विभागाने केले होते. तालुक्याचा विस्तार पहाता अधिकाधिक विद्यार्थ्यांना  सहभाग घेता यावा यासाठी गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील यांनी संगमेश्वर तालुक्यात चार ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन केले.

संगमेश्वर तालुक्यात न्यू इंग्लिश स्कूल देवरुख येथे केंद्रप्रमुख म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी शशिकांत त्रिभुवने, तु. गांधी विद्यालय साखरपा येथे केंद्रप्रमुख म्हणून विस्तार अधिकारी श्रीम. एस. आर. शिंदे ,  पैसा फंड इंग्लिश स्कूल , संगमेश्वर येथे केंद्र प्रमुख म्हणून विस्तार अधिकारी विनायक पाध्ये, उपशिक्षक सुभाष जाधव, जि. प. शाळा आरवली नं. १ येथे केंद्रप्रमुख म्हणून संदीप गायकवाड आणि देवदत्त देवलाटकर यांनी काम पाहिले. पा स्पर्धेसाठी एकूण दहा विषय देण्यात आले होते. स्पर्धेसाठी दोन तास वेळ देण्यात आला होता. व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वर येथे पाच शाळांमधून ७३ विद्यार्थी स्पर्धेसाठी प्रविष्ट झाले.

शिक्षण विस्तार अधिकारी विनायक वसंत पाध्ये यांचे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर यांनी स्वागत केले. संस्था सचिव धनंजय शेट्ये यांनी व्यापारी पैसा फंड संस्था कलाविषयक विविध उपक्रमासाठी नेहमीच सहकार्य करेल, असे आश्वासन याप्रसंगी शिक्षण विभागाला दिले . शिक्षण विस्तार अधिकारी विनायक पाध्ये यांनी पैसा फंड येथे स्पर्धेसाठी प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करुन विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.

केवळ बक्षिसासाठी चित्र न रेखाटता कलाकृतीमधून प्रथम तुम्हाला आनंद मिळुद्या म्हणजे तुम्ही नक्कीच बक्षिसासमिप पोहचू शकाल. विविध स्पर्धेत भाग घेतल्यामुळे अनुभव मिळतो आणि आत्मविश्वास दुणावतो त्यामुळे बक्षिसाची चिंता न करता नेहमी स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

स्पर्धेसाठी व्यापारी पैसा फंड संस्था, पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वर यांनी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद दिले. पैसा फंड इंग्लिश स्कूल या केंद्रावर  एकूण ७३ तर आरवली केंद्रावर येथे ९५ विद्यार्थी सहभागी झाले होते. तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील यांनी सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, कलाशिक्षक, सहभागी शाळा, सहभागी विद्यार्थी यांना धन्यवाद दिले आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE