रत्नागिरी : गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरात माघी गणेशोत्सवानिमित्त बुधवारी आकर्षक सजावट करण्यात आली होती. माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
माघी गणेशोत्सवानिमित्त गणपतीपुळे येथील मंदिरात आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी श्री गणेश जयंतीचे अवचित्य साधून देवस्थाकडून मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

















