ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेत

पनवेल : राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना जनसंपर्क कार्यालय खारघर (पनवेल) येथे अनेकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पनवेलमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांसमवेत ना. उदय सामंत व इतर मान्यवर.
नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे वितरित करताना ना. उदय सामंत, आमदार भरत गोगावले, आमदार थोरवे आदी.

यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना ना उदय सामंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी आ.भरतशेठ गोगावले, आ.महेंद्र थोरवे, रुपेश पाटील, प्रथमेश सोमण, रुपेश ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE