पनवेल येथून मडगावसाठी आज रात्री स्पेशल ट्रेन!

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर मडगाव ते पनवेल मार्गावर दि. २९ जानेवारी २०२३ रोजी रिटर्न्ड स्पेशल गाडी धावणार आहे.

संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ०१४०३० ही विशेष ट्रेन रविवार दि. २९ जानेवारी २०२३ रोजी मडगाव येथून सकाळी ८.३० वाजता सुटली असून पनवेलला ते त्याच दिवशी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (०१४२९) पनवेल येथून दि. २९ जानेवारी रोजी रात्री ९ वा. १५ मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मडगावला ती सकाळी ८.३० वाजता पोहोचेल.

आपल्या प्रवासात ही विशेष ट्रेन करमाळी, थिवी, सावंतवाडी कुडाळ,  कणकवली, वैभववाडी, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर चिपळूण, खेड, माणगाव तसेच रोहा स्थानकावर थांबे घेणार आहे.

स्पेशल ट्रेन प्रमुख स्थानकांवर यावेळी येईल.

खेड – रात्री 12.10, चिपळूण – 12.32, संगमेश्वर – 1.10, रत्नागिरी – 2.25, कणकवली – पहाटे 4.25, सिंधुदुर्ग – 4.18

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE