रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणारी सुरतकल ते लोकमान्य टिळक टर्मिनस (01454) या विशेष रेल्वे गाडीचे आरक्षण दिनांक 31 जानेवारीपासून सुरू होत आहे.
कोकण रेल्वे मार्ग धावणारी सुरतकल ते मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस (01454) या विशेष गाडीची घोषणा कोकण रेल्वेकडून या आधीच करण्यात आली आहे. या गाडीचे आरक्षण आय आर सी टी सी या संकेतस्थळावर तसेच रेल्वेच्या संगणकीकृत आरक्षण खिडकीवर दिनांक 31 जानेवारी 2023 पासून सुरू होत आहे.















