रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड या जिल्ह्यांसाठी पिल्लई कॉलेज नवीन पनवेल येथे आज शिकाऊ उमेदवार कार्यशाळा

अलिबाग : कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याद्वारे शिकाऊ उमेदवारी व राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी योजना या संदर्भातील विविध सुधारणा विचारात घेऊन या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे तसेच योजनेच्या प्रचार प्रसाराकरीता जिल्हास्तरावर ” Apprenticeship Awareness Workshop” आयोजित करण्यात आली आहे.


रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड या जिल्ह्यांकरिता दि. 02 फेब्रुवारी 2023 रोजी पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनियरींग (ॲटोन (मस), सेक्टर-16, नवीन पनवेल येथे सकाळी 9.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेमध्ये संबधित सहभागधारक जसे विविध क्षेत्रातील उद्योग व आस्थापना, शैक्षणिक संस्था, सेक्टर स्कील कॉन्सिल्स प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) अंतर्गत येणाऱ्या प्रशिक्षण संस्था इत्यादींना आमंत्रित करण्यात येणार आहे. तरी इच्छुक सहभाग धारकांनी (https://forms.gle/uwDTS31kdi1V7Lwn6) या गुगल लिंकवर माहिती भरुन दि. 01 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे, असे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र पनवेल श्रीमती विद्या पाटील यांनी कळविले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE