उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यात उद्या विविध कार्यक्रम

रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम जाहीर झाला आहे आहे. ना. सामंत यांच्या उपस्थितीत रविवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ना. सामंत यांच्या प्राप्त दौऱ्यानुसार रविवार  ५ फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 08.30 वाजता पाली येथून मोटारीने संगमेश्वरकडे प्रयाण, सकाळी 09.30 वाजता विश्व समता कलामंच लोवले, ता. संगमेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र-रत्नागिरी व चंद्रकांत चव्हाण स्मृतीगंध प्रतिष्ठान लोवले आयोजित राज्यस्तरीय विश्व समता पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ: शुभगंधा मंगल कार्यालय, लोवले, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) सकाळी 10.00 वाजता लोवले येथून मोटारीने चिपळूण कडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता लो. टिळक स्मारक वाचन मंदिराचे अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्र आयोजित पर्यटन लोककला सांस्कृतिक खाद्य महोत्सव उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : सह्याद्रीनगर, श्री जुना कालभैरव मंदिराच्या प्रांगणात, कै. बापू बाबाजी सागावकर मैदान, मु.पो. चिपळूण, जि. रत्नागिरी) दुपारी 12.30 वाजता राष्ट्रसंत श्री रोहिदास महाराज जयंती सोहळ्यास उपस्थिती.( स्थळ : रोहिदास भवन, मार्कण्डी, चिपळूण) दुपारी 01.00 वाजता श्री स्वामी मठ ते बहादुरशेख नाका या रस्त्याचे मा. आमदार कै. सुर्यकांत बापुसाहेब खेडेकर नामकरण फलक अनावरण कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ: श्री स्वामी मठ, मार्कण्डी) दुपारी 01.15 वाजता मार्कण्डी, चिपळूण येथून मोटारीने पिंपळी खुर्द, ता. चिपळूण कडे प्रयाण. दुपारी 01.30 वाजता “वाशिष्ठी” मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स च्या नविन प्रकल्पाचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : “वाशिष्ठी” दुग्ध प्रकल्प, पिंपळी खुर्द, काळकाई मंदिरासमोर, ता. चिपळूण).

तसेच दुपारी 02.30 वाजता पिंपळी खुर्द. ता. चिपळूण येथून मोटारीने रत्नागिरी कडे प्रयाण. दुपारी 04.30 वाजता रत्नागिरी येथे आगमन व राखीव. सायंकाळी 07.00 वाजता पीर बाबर शेख ऊरुस निमित्त पीर बाबा दर्शन व ऊरुस कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ : हातिस, ता.जि. रत्नागिरी) रात्रौ 10.50 वाजता मोटारीने रत्नागिरी रेल्वे स्थानकाकडे प्रयाण.  रात्रौ 11.15 वाजता रत्नागिरी रेल्वे स्थानक येथे आगमन व कोंकणकन्या एक्सप्रेसने  मुंबईकडे  प्रयाण असा उद्योग मंत्र्यांचा दौरा आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE