रत्नागिरी : माघ वद्य चतुर्थीनिमित्त (संकष्ट चतुर्थी ) गणपतीपुळे येथील मंदिरात गुरुवारी हजारो भाविकांनी गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
संकष्टी चतुर्थी निमित्त गणपतीपुळे येथे मंदिरात गुरुवारी असंख्यभागी दाखल झाले होते. यानिमित्त मंदिरात मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी मंदिरात श्रींच्या गाभाऱ्यासमोर फुलांची आकर्षक आरास केली होती. पश्चिम कोकण तसेच महाराष्ट्रासह विविध भावाभागातून आलेल्या भाविकांनी श्रींचे मनोभावे दर्शन घेतले.

















