https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

Konkan Railway | गणेशोत्सवासाठी आणखी विशेष गाड्या जाहीर

0 128

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर गणपती स्पेशल गाड्यांच्या आणखी काही फेऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत. गुजरातमधील उधना ते मडगाव, अहमदाबाद कुडाळ तसेच उधना ते मंगळूर दरम्यान या गाड्या धावणार आहेत.

कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी याआधी अनेक फेऱ्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून कोकण रेल्वे मार्गावर आणखी काही गाड्यांची भर पडली आहे.


या संदर्भात कोकण रेल्वे माहितीनुसार उधना ते मडगाव ही द्वि साप्ताहिक गाडी (09020) दि. 16 20 व 23, 27, 30 सप्टेंबर 2023 रोजी उधना येथून दुपारी 3 वाजून 25 मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी ती मडगावला दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात मडगाव येथून (09019) उधनासाठी निघणारी गाडी दिनांक 17, 21, 24, दिनांक 28 सप्टेंबर 2023 दिनांक 01 ऑक्टोबर 2023 या दिवशी गणपती स्पेशल गाडी सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी सुटेल आणि सुरत जवळील उधना येथे दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता ते पोहोचेल.


उधना-मडगाव स्पेशलचे थांबे

नवसारी, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी.

या गाडीशिवाय अहमदाबाद ते कुडाळ मार्गावरील गणपती विशेष गाडी 09412/09411) ही आठवड्यातून एकदाच होणार आहे. ही गाडी दिनांक 12 19 व 26 सप्टेंबर रोजी अहमदाबाद येथून तर दिनांक 13 20 व 27 सप्टेंबर 2023 रोजी कुडाळ येथून सुटणार आहे.

अहमदाबाद-कुडाळ स्पेशल गाडीचे थांबे


गाडी वडोदरा जंक्शन, सुरत, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, या ठिकाणी थांबेल. कणकवली आणि सिंधुदुर्ग.

तिसरी विशेष गाडी उधना ते मंगळूर दरम्यान आठवड्यातून एकदा जाणार आहे.
ही गाडी 09057/09058 ही उदना येथून 13, 29 27 सप्टेंबर 2023 रोजी तर मंगळूर येथून उदनासाठी दिनांक 14 21 व 28 सप्टेंबर 2023 रोजी सुटणार आहे.


उधना-मंगळुरू गणपती स्पेशलचे थांबे


गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव येथे थांबेल. जं., कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमता, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल स्टेशन.

Leave A Reply

Your email address will not be published.