कांडकरी प्रिमिअर लिगचे विजेतेपद इलेव्हन फायटर संघाकडे

देवरुख :  संगमेश्वर तालुक्यातील कासार कोळवण येथे श्री कांडकरी प्रिमीअर लिग क्रिकेट स्पर्धेचे तिसरे पर्व पार पडले. या तिसर्‍या पर्वाचे विजेतेपद कासार कोळवण इलेव्हन फायटर या संघाने तर उपविजेते पद श्री सांबा कांडकरी युवा प्रतिष्ठान या संघाने पटकावले. तर तृतीय क्रमांक ओल्ड स्टार संघाने पटकावला.
दिनांक 8 व 9 मे रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण 8 संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत मालिकावीर आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मनोहर करंबेळे याला गौरविण्यात आले. तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून अनिकेत घाटबाने याला गौरविण्यात आले. विजेत्या संघाला गावचे सरपंच, पोलिस पाटील, मुरादपूर सरपंच मंगेश बांडागळे, गावाचे प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत चषक व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. उपविजेता व तृतीय संघाचेही चषक व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेदरम्यान सहकार्य करणार्‍यांचा सन्मान करण्यात आला.

या स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी गावातील तरुणांनी विशेष मेहनत घेतली. त्यांनी सर्व सहभागी खेळाडूंचे, मान्यवरांचे व ग्रामस्थांचे आभार मानले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE