रत्नागिरी जिल्ह्यात १८ मार्चपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस

हवामान खात्याकडून इशारा

रत्नागिरी  : हवामान विभाग मुंबई यांच्याकडून हवामान विषयक प्राप्त संदेशानुसार दिनांक 16 ते 18 मार्च 2023 या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात वादळी वारे व विजांच्या  कडकडाटासह पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे.

पावसाचा हा इशारा लक्षात घेऊन नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनाही सतर्क राहण्यास सूचित करण्यात आले आहे

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE