हवामान खात्याकडून इशारा
रत्नागिरी : हवामान विभाग मुंबई यांच्याकडून हवामान विषयक प्राप्त संदेशानुसार दिनांक 16 ते 18 मार्च 2023 या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे.

पावसाचा हा इशारा लक्षात घेऊन नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनाही सतर्क राहण्यास सूचित करण्यात आले आहे














