उरण तालुक्यातील सोनारीची कन्या मिताली कडू बनली आयसीआयसीआय बँकेची अधिकारी!


उरण (विठ्ठल ममताबादे ): उरण तालुक्यातील सोनारी गावाचे रहिवासी आणि सामान्य घरातून आलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे दिगंबर कडू. ते स्वतः जेएनपीटी मध्ये प्रशासकीय भवन येथे वरिष्ठ सहाय्यक म्हणून प्रामाणिकपणे काम पाहतात. त्यांच्या तिन्ही मुलांनी शिक्षणाच्या बाबतीत उच्च शिखरे गाठली असून त्यांच्या मोठ्या मुलीने म्हणजेच मितालीने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून भारतातील प्रसिद्ध अशा आय आय एम रांची येथून एम बी ए चे शिक्षण पूर्ण केले. ते शिक्षण घेत असतानाच तिने कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये आय सी आय सी आय बँक(हेड ऑफिस, मुंबई ) येथे मोठ्या पदावर नोकरी मिळवली होती. तिने आपल्या वडिलांचा आदर्श समोर ठेवून अतिशय उत्तम प्रकारे काम केल्यामुळे तिचे प्रमोशन होवून मितालीला सिनियर मॅनेजर पदावर बढती मिळाली असून सर्वात महत्त्वाचे म्हणजे वार्षिक 22 लाख रुपयांचे पॅकेज तिला मिळाले आहे.

तिने केलेल्या ह्या देदिप्यमान कामगिरी बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.चाहते, मित्र वर्ग, कडू परिवार व विविध सामाजिक संस्थांनी मिताली कडू हिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.आणि या यशात मिताली कडूच्या आई वडिलांचेही महत्वाचे योगदान असल्याने तिचे आई वडील यांचे देखील सर्वांनी अभिनंदन केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE