विमानतळावर महिन्याभरात नाईट लँडिंगची सुविधा
रत्नागिरी : येथील तटरक्षक दलाच्या ताब्यात असलेल्या विमानतळावर एका महिन्याभरात विमानांच्या नाईट लँडिंगची व्यवस्था केली जाईल, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. त्यामुळे रत्नागिरीवासियांचे विमान प्रवासाचे स्वप्न आता लवकरच साकारणार आहे. वाढीव धावपट्टीसाठी भूसंपादन व अन्य अडचणीमुळे येथील विमानतळाचे काम नागरी वाहतुकीसाठी रखडले आहे.
येथील एमआयडीसी क्षेत्रातील विश्रामगृहाच्या जुन्या इमारतीचे नूतनीकरण केले जाणार आहे. त्याचे भूमिपूजन रविवारी राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
या कार्यक्रमात बोलताना ना सामंत यांनी रत्नागिरीतील विमानतळाविषयी ही महत्त्वाची माहिती दिली.
यावेळी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, एमआयडीसीचे मुख्य अभियंता सुभाष तुपे, कार्यकारी अभियंता राक्षे, ज्येष्ठ उद्योजक दिलीप भाटकर, फेडरेशन ऑफ रत्नागिरी डी स्टीक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन, उपअभियंता बी.एन.पाटील, माजी नगराध्यक्ष राहुल पंडीत,vमाजी जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप आदी मान्यवर उपस्थित होते.















