- ८ मे रोजी आकाशवाणीवर प्रसारण
रत्नागिरी – नुकताच सुवर्ण महोत्सव साजरा केलेल्या आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर दर शुक्रवारी पर्यटन विषयक कार्यक्रम कोकण दर्शन प्रसारित होणार आहे. आठ मे रोजी प्रसारित होणाऱ्या पहिल्याच भागात रत्नागिरी नजीकच्या कर्ला या गावाची सफर या कार्यक्रमामधून करता येणार आहे.
रोज सकाळी आठ वाजून 40 मिनिटांनी नवनवीन कार्यक्रमांची मेजवानी श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे. यामध्ये दर शुक्रवारी निसर्गरम्य कोकणाची सफर कोकण दर्शन हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. कोकणातल्या अनवट वाटा, हिरव्यागार वनराईत दडलेली पर्यटकांना खुणावणारी वेगवेगळी ठिकाणे, इथले गडकिल्ले अशा विविध पर्यटन स्थळांचा मागवा घेणारा हा कार्यक्रम म्हणजे कोकण दर्शन. रत्नागिरी शहरापासून जवळच असलेल्या कर्ला या गावात पर्यटकांना मिळणारा जलसफरिचा आनंद, इथला वैशिष्ट्यपूर्ण व्यवसाय या गावाच्या आजूबाजूचा परिसर या सगळ्या गोष्टींचा मागवा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. कार्यक्रमाचे लेखन सोनाली सावंत यांनी केलं असून निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत आणि वंदना मुसळे यांच आहे. या कार्यक्रमाचे सादर करते विवेक वानखडे हे आहेत.
मध्यम लहरी 1143 किलो हर्ट्स या वाहिनीवर तसेच 101.5 मेगा हर्टझ या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ओन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲप वर हा कार्यक्रम श्रोत्यांना थेट ऐकायला मिळेल प्रसारणानंतर ए आय आर रत्नागिरी या आकाशवाणीच्या यूट्यूब चैनल वरही हा कार्यक्रम ऐकण्यासाठी उपलब्ध होईल. आकाशवाणी रत्नागिरी वर गेली अनेक वर्ष भरभरून प्रेम करणाऱ्या सर्व श्रोत्यांनी आवर्जून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असं आवाहन करण्यात आल आहे.













