रत्नागिरी : नागपूरच्या धर्तीवर रत्नागिरी देखील लवकरच कारंजेरुपी पाण्याच्या भव्य स्क्रीनवर रत्नागिरी जिल्ह्याचा इतिहास दाखवणार असल्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली. यासाठी 25 कोटी रुपयांचा खर्च करणार केला जाणार आहे. येथे उभारण्यात येणाऱ्या या म्युजिकल फाउंटन स्थळाची आज (मंगळवारी) पाहणी केली जाणार आहे.

नागपूर येथे या आधीच वॉटर फाउंटन उभारण्यात आले आहे. वॉटर फाउंटन च्या माध्यमातून पाण्याच्या भव्य स्क्रीनवर रत्नागिरी जिल्ह्याचा प्रेरणादायी इतिहास मांडणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनीजाहीर केले आहे.
वॉटर फाउंटन रत्नागिरीकरांसाठी एक अमूल्य भेट असेल. याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याने देशाला दिलेल्या सहा भारतरत्नांचे जिल्ह्यात भव्य पुतळे उभारून त्यांच्या विचारांची जपणूक करणार असल्याची माहिती ना. सामंत यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत दिली.














