राज्यातील ५० हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवरील कृषी पंपांसाठी अनुदान लाभ मिळणार
मुंबई : राज्यातील ५० हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवरील कृषी पंपांसाठी चालू आर्थिक वर्षात (२०२२-२३) अनुदान दिले जाणार आहे.या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी महाकृषी अभियानांतर्गत येत असलेल्या पंतप्रधान कुसुम घटक-ब योजनेअंतर्गत सौर कृषी पंपासाठी महाऊर्जाच्या ई-पोर्टलवर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी याबाबतचा आपापला लाभार्थी हिस्सा भरणे अनिवार्य आहे. हा हिस्सा भरण्यासाठीची अंतिम मुदत संपली होती. परंतु यासाठी आता येत्या येत्या ३१ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी या मुदतीत ही रक्कम भरावी, असे आवाहन महाऊर्जाचे महासंचालक रवींद्र जगताप यांनी केले आहे.