रत्नागिरीतील कोकण नगरचा परिसर हायमास्ट दिव्यांनी उजळला

रत्नागिरी : रत्नागिरीतील कोकण नगरचा परिसर हायमास्ट दिव्यांनी नुकताच उजळून निघाला आहे. शहरातील वर्दळीची ठिकाणे तसेच प्रमुख नाक्यांवर नगर परिषदेकडून हायमास्ट दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत आता कोकण नगरच्या प्रमुख वर्दळीच्या ठिकाणी हायमास्ट पथदीप  उभारण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून कोकण नगरचा परिसर दाट वस्तीने गजबजून गेला आहे. रात्रंदिवस या भागात मोठी वर्दळ असते. आता या भागात पथदिव्यांची व्यवस्था झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE