हापूसला वाढत्या तापमानाचा फटका

 

रत्नागिरी : बदलत्या हवातानाचा व वाढत्या तापमानाचा फटका हापूस आंब्याला बसत आहे. तापमान वाढीमुळे झालेल्या उष्माघाताचा फटका आंब्याला बसल्याने बहुतांश ठिकाणी आंब्यावर डाग उठल्याने आंबे खराब होऊन गळू लागले आहेत. काही ठिकाणी उष्माघातामुळे फळ पिवळे पडत आहे. त्यामुळे गळ मोठ्या प्रमाणात होत असून बागायतदारांचे आर्थिक गणित विस्कटले असल्याने ते चिंतातूर झाले आहेत.


वाढता उष्मा, अवकाळी पाऊस, वातावरणातील बदलाने लांबलेला पावसाळा आणि उशिराने सुरू झालेली थंडी यामुळे हापूस काहीसा उशिराने मोहरला. त्यानंतरही या मोहरावर थ्रीप्स आणि तुडतुडा या रोगाचा प्रादुर्भा वाढला. परिणामी मोठ्या प्रमाणा औषध फवारणी करावी लागली. अश् परिस्थितीमध्ये काही प्रमाणात हापूू हाताशी लागेल, बागायतदारांची होती. पण सध्य वातावरणात उष्मा वाढला असून त्या परिणाम आता हापूसवर जाणवत आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE