रत्नागिरी : रत्नागिरी मतदारसंघातील मिरजोळे गावातील ४ कोटी रुपयांचा निधी खर्चून करण्यात येणारे विविध विकास कामांचे भूमिपूजन शुक्रवारी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख महेश तथा बाबू म्हाप, मिरजोळे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच गजानन गुरव, उपसरपंच संचिता सनगरे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.















