रत्नागिरी : चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थीनिमित्त महाराष्ट्रातील तमाम भाविकांचे आराध्य दैवत असलेलले गणपतीपुळे येथील श्रींचे मंदिर फुलांच्या आकर्षक सजावटीने भाविकांसाठी सज्ज झाले आहे. उन्हाळी हंगाम आणि संकष्टी चतुर्थी या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने भाविक संकष्टी चतुर्थीच्या आधीच गणपतीपुळे येथे पोहोचले आहेत.


मंदिरासमोरच रमणीय असा सागर किनारा लाभलेला असल्याने महाराष्ट्राचा इतर भागातून पर्यटकांची सतत या ठिकाणी वर्दळ सुरु असते. संकष्टी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर देवस्थानमार्फत मंदिरात रविवारी फुलांचे आकर्षक सजावट करण्यात आली होती. मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी ही सजावट करण्यासाठी पुढाकार घेतला.












