शाळांना २ मेपासून ११ जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी!

मुबंई : दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र देखील काही दिवसांत संपणार आहे. पहिली ते नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा १५ एप्रिलपूर्वी संपवली जाणार आहे. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होऊन १ मे रोजी त्यांना प्रगतीपत्रक दिली जातील. शाळांना २ मे पासून सुटी लागणार आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ तर माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या एक हजार ६३ शाळा आहेत. त्याअंतर्गत पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास चार लाखांपर्यंत आहे. त्या सर्वच मुलांची आता अंतिम सत्र परीक्षा सुरु आहे. खासगी प्राथमिक शाळांनी देखील त्याचे नियोजन केले आहे.

१५ एप्रिलनंतर १ मेपर्यंत शाळा सुरु राहणार आहे. पण, परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याचे शाळांकडून बंधन घातले जात नाही. कोरोनानंतर पहिल्यांदाच यंदा पूर्ण वर्षभर शाळा सुरळीत सुरु राहिल्या. विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्याचा शिक्षकांकडून प्रयत्न झाला. पण, अजूनही बरेच विद्यार्थी विशेषतः: थेट पहिलीतून तिसरीत व तिसरीतून पाचवीत गेलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावलेलीच आहे. त्यांच्याकडे उन्हाळा सुटीत लक्ष द्यावे लागणार आहे.


Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE