रत्नागिरीत उद्या आंबा बागायतदारांच्या समस्यांसंदर्भात बैठक

रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी तीन वाजता जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या समस्यांसंदर्भात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार 12 एप्रिल 2023 रोजी दुपारी 01.30 वाजता कॉर्पोरेट पार्क, हेलिपॅड, खारघर, नवी मुंबई येथून हेलिकॉप्टरने रत्नागिरी कडे प्रयाण. दुपारी 02.30 वाजता हेलिकॉप्टरने रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व मोटारीने अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, रत्नागिरी कडे प्रयाण. दुपारी 03.00 वाजता आंबा बागायतदारांच्या अडी-अडचणींसंदर्भात बैठक. (स्थळ : अल्पबचत सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, रत्नागिरी) सांयकाळी 05.00 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा, रत्नागिरी. (स्थळ : मध्यवर्ती कारागृह, रत्नागिरी ते लक्ष्मी चौक, रत्नागिरी) सोईनुसार शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव. रात्रौ 10.50 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून मोटारीने रत्नागिरी रेल्वे स्थानक कडे प्रयाण.रात्रौ 11.15 वाजता रत्नागिरी रेल्वेस्थानक येथून कोकणकन्या एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE