रोजगाराला दिशा देणाऱ्या रत्न-सिंधू योजनेचा लाभ घ्या
आमदार योगेश कदम यांचे आवाहन
दापोली : कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्हयांसाठी असलेल्या रत्नसिंधू या अर्थसहाय्य देऊन आपल्याला रोजगार उद्योगाची दिशा देणाऱ्या या योजनेचा लाभ दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी महिला बचतगटांनी करून घ्यावा, असे अवाहन आमदार योगेश केले.
दापोली शहराजवळ असलेल्या गिम्हवणे गजानन महाराज नगर येथील श्री भानेश्वर मंदीर ते श्रीराम मंदिर दुबळे वाडी या रस्त्याच्या उद्घाटन व ग्रामस्थांकडून करण्यात आलेल्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. श्रीराम मंदिर येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. गिम्हवणे दुबळेवाडी ग्रामस्थ व गजानन महाराज नगराकडून आमदार योगेश कदम यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला शिवसेना संघटक उन्मेश राजे, राजू पेठकर, विभागप्रमुख मोहन शिगवण, सुनील गुरव, शंकर साळवी, गिम्हवणे वणंद ग्रुप ग्रामपंचायत सरपंच साक्षी गिम्हवणेकर,उपसरपंच किशोर काटकर,सदस्य उर्मिला झुजम, संजना देवघरकर, सुभाष झगडे,ज्येष्ठ शिवसेना कार्यकर्ते विष्णू भुवड,नरेश दुबळे, सुरेशभाई भूवड,पत्रकार कैलास गांधी,मिलिंद लांबे,सुरेंद्र गिम्हवणेकर, संदेश देवघरकर, बाळु झुजम,सनी दुबळे, दुबळेवाडी महिला मंडळ अध्यक्ष मानसी दुबळे, सुवर्णा खळे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
नव्वद टक्के अर्थसहाय्य देणारी ही अतिशय चांगली योजना असून यासाठी आवश्यक ते सगळे मार्गदर्शन केले जाईल अशी ग्वाही आमदार योगश कदम यांनी दिली.कोकणातील साकव दुरूस्ती कार्यक्रमात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्वतः लक्ष घातले आहे त्यामुळे तुमच्या येथील साकवाचे कामही लवकरच मार्गी लागेल अशी ग्वाही आमदार योगेश कदम यांनी दिली.
यावेळी गिम्हवणे ब्राह्मणवाडी स्मशानभूमीसाठी लवकरच निधी उपलब्ध करून दिला असा शब्द यावेळी त्यांनी उपस्थित ब्राह्मणआळी ग्रामस्थांना दिला. कार्यक्रमाचे व सूत्रसंचालन उपस्थितांचे आभार संजय जाधव यांनी केले.