पणजी येथे क्षेत्रीय स्तरावरील डाक अदालतीचे २१ जूनला आयोजन


रत्नागिरी दि. ११ : पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी 403001 द्वारा 21 जून 2023 रोजी क्षेत्रीय स्तरावरील 54 वी डाक अदालत 12.00 वाजता माननीय पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी 403001 यांचे कार्यालयामध्ये आयोजित करीत आहे.


पोस्टाच्या कार्यपद्धतीविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निराकरण सहा आठवडयांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातात. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव, पत्ता इ. संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार यु. विजया कुमार, सेक्रेटरी डाक अदालत व सहाय्यक डाक निदेशक, गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी 403001 यांचे नवे अतिरिक्त प्रतिसह 31 मे 2023 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावे. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे सहायक डाक निदेशक,  गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी यांनी कळविले आहे.
 

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE