रत्नागिरीतील प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीला मिळणार दोन लाखाचा विकास निधी

रत्नागिरीतील हाऊसिंग सोसायट्यांसाठी ३ कोटींचा निधी राखीव : पालकमंत्री उदय सामंत


रत्नागिरी : शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे.


येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत गुरुवारी हा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी शहरातील गृहनिर्माण सोसायटी यांचा आढावा या बैठकीत घेतला.


बैठकीत ठरल्यानुसार आमदार निधीतील पाच कोटींपैकी तीन कोटी सोसायट्यांच्या विकास कामांसाठी राखीव ठेवले असून प्रत्येक सोसायटीला दोन लाखांपर्यंतची कामे करता येतील, असे यावेळी पालकमंत्र्यांकडून सांगण्यात आले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE