‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी दापोलीत पालकमंत्र्यांची नियोजन बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रत्नागिरीत होणार भव्यदिव्य कार्यक्रम

दापोली : महाराष्ट्र शासनाच्या “शासन आपल्या दारी” या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या नियोजनासंदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांनी आज ( मंगळवारी) श्री शिवछत्रपती सभागृह, दापोली येथे आढावा बैठक घेतली.


यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, दापोली उपविभागीय अधिकारी डॉ.अजित थोरबोले, खेड उपविभागीय अधिकारी श्रीमती राजश्री मोरे व इतर अधिकारी-कर्मचारी, शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्ह्याचा शासन आपल्या दारी कार्यक्रम दि. 25 मे २०२३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहेत. या कार्यक्रमाची तयारी जिल्हास्तरावर गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून दापोली पालकमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी बैठक घेतली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE