मुंबई : दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम हे गेले काही दिवस प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल होते. कालच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजारी असलेल्या आ. योगेश कदम यांच्या मुंबईतील मस्तानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार योगेश कदम यांना प्रकृतीची काळजी घेऊन लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे, आणि पुन्हा एकदा त्याच जोमाने लोकसेवेसाठी कार्यरत व्हावे, असा सल्ला दिला.















