खदानीमध्ये चिखलात अडकलेल्या गाईला मिळाले जीवनदान!

केअर ऑफ नेचर संस्थेच्या कार्यकर्त्यांचे कौतुक

उरण दि ७ (विठ्ठल ममताबादे ) : दि.०५ जुन २०२३ रोजी चिरनेर बापूजी देव मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या खदानीमध्ये मुकी जनावर तहान भागविनण्यासाठी जात असतात. पाणी पीऊन सर्व जनावर बाहेर निघाली. मात्र, एक गाय चिखलात अडकली. तीला बाहेर निघता येत नव्हते. याबाबतची माहिती मिळताच केअर ऑफ नेचर संस्थेचे कार्यकर्ते गोमातेच्या रक्षणासाठी सरसावले.

खदानीतील चिखलात गाय अडकून पडल्याची माहिती केअर ऑफ नेचर संस्थेचे उपाध्यक्ष महेश पाटील यांना समजताच महेश पाटील यांनी श्री. महागणपती अकॅडेमी चिरनेरचे विद्यार्थी कु.अतिष नारंगीकर,जयहिंद ठाकुर,प्रेमल पाटील, अदित्य डुंगीकर यांना घेऊन घटनास्थळी गेले. सर्व पाहणी करुन आपल्या साथीदारांच्या मदतीने त्या गाईला बाहेर काढून तिला जीवदान दिले.

ही बातमी गावात समजताच केअर ऑफ नेचर आणि श्री. महागणपती अकॅडेमीच्या पदाधिकाऱ्यांचे सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आणि या पुढेही असेच चांगली काम तुमच्या हातुन व्हावे असे शुभेच्छा दिल्या.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE