खेडनजीक गरीबरथ एक्सप्रेसमधून पडून प्रवाशाचा मृत्यू

रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या अप गरीबरथ एक्सप्रेसमधून पडल्यामुळे हरिश जयराम शेट्टी नामक प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. हा प्रवासी ठाण्यातील मिरा रोड भागात राहणारा होता.

केरळमधील कोचुवेली ते मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस प्रवास करणाऱ्या हरिश जयराम शेट्टी (रा.काशिमिरा, हाॅटेल अमर पॅलेसच्या मागे, मिरा रोड, ठाणे) याचा शनिवार दि.१० रोजी सकाळी ७ वाजण्यापूर्वी खेड तालुक्यातील कोंडीवली बौद्धवाडीजवळ रेल्वेतून पडून मृत्यू झाला आहे. 

या अपघाताची माहिती येथील मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेऊन तो कळबणी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे. पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE