देवरूख (सुरेश सप्रे) : आमदार शेखर निकम यांनी जिल्हा वर्षिक जनसुविधा योजने अंतर्गत दिलेल्या निधीतुन उभारण्यात आलेल्या ग्रामपंचायत इमारतीचा उद्घाटन सोहळा आ. निकम यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी नायरी ग्रामस्थ व पंचक्रोशीचे वतीने आमदारांनी दिलेल्या निधीतून पंचक्रोशीतील विविध विकास कामे केली. विषेश करून शास्त्री पुल ते निवळी रस्ता कामासाठी निधी दिल्याबद्दल आमदार शेखर निकम यांचा पंचक्रोशीतील जनतेने विशेष असा सत्कार केला. आमदार शेखर निकम यांनी शास्त्री
पूल ते निवळी रस्ता,
पांचाबे नेरदवाडी रस्ता,
अंत्रवली कडवई रस्ता यांच्या कामासाठी बेजट अंतर्गत महाविकास आघाडी सरकारच्या कालावधी मध्ये निधी उपलब्ध दिला होता.. त्यामुळे हे रस्ते पूर्ण होऊ शकले.
आगामी काळात या भागामध्ये पाझर तलाव होण्यासाठी विशेष प्रयत्न करून या भागातील विकास कामासाठी भरघोस निधी देण्याचे आश्वासन आ. निकम यांनी दिले.
यावेळी माजी सभापती सुजित महाडीक, संगमेश्वर गटविकास अधिकारी भारत चौगुले,नायरी सरपंच प्रियांका चाळके, शृंगारपूर सरपंच विनोद पवार, निवळी सरपंच दौलत पवार,तिवरे सरपंच मनिषा गुरव, कारभाटले माजी सरपंच राजेंद्र पोमेंडकर, डॉ. इरशाद पाटणकर, अकबर पाटणकर,कृष्णा पवार आदी उपस्थित होते.
