रत्नागिरी : सिंधुरत्न समृध्द योजनेसाठी मंजूर 8 कोटी 84 लाख रकमेपैकी रत्नागिरी जिल्ह्याला प्राप्त 2 कोटी 83 लाख 71 हजार रकमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यातील 2 कोटी 70 लाख 69 हजार रुपये निधी यंत्रणांना वितरीत करण्यात आला आहे.
2022-23 ते 2024-25 या तीन वर्षात विविध यंत्रणांनी यात कामे करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.bमंजूर केलेल्या कामांची यंत्रणानिहाय यादी पुढीलप्रमाणे आहे.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील सिंधुरत्न कार्यालयाची दुरुस्ती करणे प्रशासकीय मान्यता रक्कम रुपये 13 लाख 2 हजार. (कार्यकारी अभियंता, उत्तर सा.बां.विभाग रत्नागिरी). रत्नागिरी जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप कार्यक्रम प्रशासकीय मान्यता रक्कम रुपये 22 लाख 80 हजार व रत्नागिरी जिल्ह्यातील नाचणी उत्पादक शेतकऱ्यांना मोफत नाचणी बियाणे वाटप कार्यक्रम रुपये प्रशासकीय मान्यता रक्कम रुपये 24 लाख 61 हजार. (जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी)
मच्छिमार महिलांना ई-स्कूटरसह शितपेटी पुरवठा करणे प्रशासकीय मान्यता रक्कम रुपये 8 लाख 95 हजार, मच्छिमारांना शीतवाहन पुरविणे प्रशासकीय मान्यता रक्कम रुपये 1 कोटी 51 लाख 33 हजार. (सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय रत्नागिरी).
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा वाहतुकीसाठी दोन कुलिंग व्हॅन उपलब्ध करणे प्रशासकीय मान्यता रक्कम रुपये 63 लाख. (उपसरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ रत्नागिरी).
