रत्नागिरी ः सामाजिक क्षेत्रासह पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सौ. मुन्नवर-सुलतान फरहान मुल्ला यांची रत्नागिरी शहर महिला कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते श्री. कुमार शेट्ये, महाराष्ट्र प्रदेश प्रांतिक सदस्य श्री. बशीर मुर्तुझा, महिला जिल्हा अध्यक्ष सौ. चित्राताई चव्हाण यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी जिल्हा युवक कार्याध्यक्ष श्री. नौसीन काझी, विधानसभा क्षेत्राध्यक्ष सौ.नसीमा डोंगरकर, महिला तालुका अध्यक्ष शमीम नाईक, महिला शहर अध्यक्ष सौ. नेहाली नार्वेकर,सौ. रजीया काझी, सौ.भिसे, मिरकरवाडा प्रभाग अध्यक्ष सौ. फरजाना मस्तन, सौ. झापडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या निवडीबद्दल सौ. मुन्नवर-सुलतान फरहान मुल्ला यांचे अभिनंदन केले जात आहे. जनतेच्या हक्कांसाठी नेहमीप्रमाणे सदैव तत्परतेने काम करत राहू, अशी ग्वाही निवडीनंतर सौ मुल्ला यांनी दिली.
