Mumbai-Goa Highway | जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केली परशुराम घाटाची पाहणी

खेड येथे आपत्ती व्यवस्थापनाचा घेतला आढावा

रत्नागिरी दि. २९ : जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज खेड तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला.


खेड तालुक्यातील पूर प्रवण तसेच दरड प्रवण क्षेत्रातील भागांची माहिती घेत या ठिकाणच्या उपायोजनांची देखील माहिती घेतली.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कीर्ती किरण पुजार, उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे, पोलीस निरीक्षक नितीन भोयर, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे आधी उपस्थित होते.


खेड तालुक्याच्या आपत्ती निवारण कक्षाला यावेळी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी भेट देऊन माहिती घेतली.
अग्निशामक दल इमारत येथे भेट देऊन जीवाची पर्वा न करता पूर परिस्थितीत मदत कार्य करणाऱ्या विसर्जन कट्टा च्या जवानांशी चर्चा केली व त्यांचा सत्कार केला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE