दोन दिवसांपूर्वी गाडी कोसळली होती नदीत
संगमेश्वर दि २९ (प्रतिनिधी) : मुंबई गोवा राष्ट्रीय मार्गावरील अपघात प्रवण क्षेत्रात धामणी आणि गोळवली गावामध्ये नदीच्या बाजूला संरक्षण म्हणून ठेकेदार कंपनीने तातडीने तात्पुरती रेलिंग उभारावीत, अशी मागणी संगमेश्वरवाशीयांनी केली आहे. दोन दिवसापूर्वी घडलेल्या अपघातानंतर ठेकेदार कंपनी आणि बांधकाम विभागाने बोध घेत हे काम त्वरित हाती घेण्यात यावे अशी मागणी होत आहे.

हेही वाचा : आकाशातून असा दिसतो मुंबई -गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्ग!
संगमेश्वर ते आरवली या अपघात प्रवणक्षेत्रात धामणी आणि गोळवली या ठिकाणी वारंवार अपघात होतात चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्त्याची खोदाई करण्यात आलेले आहे. तसेच जोड रस्ते ही खराब झालेले आहेत त्यामुळे खड्डा चुकवत असताना गाड्या नदीमध्ये कोसळण्याची शक्यता असते. तसेच या प्रकारचे अपघात घडलेले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या बाजूला रेलिंग उभारण्यात यावीत अशी मागणी होत आहे तसेच दोन दिवसांपूर्वी घडलेल्या अपघातानंतरही बांधकाम विभागाला जाग येईल का? असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.














