रत्नागिरी, दि. १९ : कोळकेवाडी धरण व धरण परिसरात काल रात्री ८ वाजल्यापासून मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. सद्यस्थितीत महाजेनकोचे चारपैकी तीन युनिट चालू असल्यामुळे वक्रदार द्वारे सांडव्यावरुन पाणी विसर्ग करण्याची शक्यता आहे.
बोलादवाडी नाला व वाशिष्ठी नदी पात्रालगत नागरिकांना न जाण्याचा इशारा देण्यात यावा, असे पत्र कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभाग आलोरेचे उपविभागीय अभियंता यांनी कोळकेवाडी, नागवे, आलोरे, पेंढाबे, खडपोली, पिंपळी खु., पिंपळी बु., सती व खेर्डी सरपंचांना पाठवले आहे. यामुळे पावसाच्या सध्याच्या स्थितीत नागरिकांना सतर्क राहावे लागणार आहे.














