२२ जुलै रोजीही शाळांना सुट्टी


रत्नागिरी, दि. 21 (जि.मा.का.) : 21 ते 25 जुलै जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी शाळा (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक) विद्यालयांना उद्या शनिवार 22 जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज दिला.


जिल्हयाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने व खेड तालुक्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. राजापूर तालुक्यातील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नेय तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये यासाठी उद्या 22 जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE