कोंढ्रणमध्ये भूस्खलनाच्या भितीच्या सावटामुळे प्रशासन सर्तक ; ४७ जणांचे स्थलांतर केले

देवरूख (सुरेश सप्रे ) : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख कोंढ्रणमध्ये सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे येथे भूस्खलन झाल्याची माहिती आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. एका घरावर दरड कोसळल्याने नुकसान झाले आहे. या घटनेमुळे तालुका प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. खबरदारी म्हणून गावातील १५ घरातील ४७ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

संगमेश्वर तालुक्यातील कोंढरण गावातील पुन्हा स्थळ पाहणी केली असता तिथे पडलेल्या भेगांची संख्या आणि सातत्याने मोठ्या होणाऱ्या भेगा पाहता तेथील लोकांचे स्थलांतर करणे आवश्यक होते. त्यानुसार तेथील १५ कुटुंबातील ४७ लोकांना स्थलांतरित करण्यात आले तर त्यांपैकी २८ लोकांची सोय तुळसणी विद्यालयात करण्यात आली आहे. तसेच उर्वरित १९ लोकांना त्यांचे नातेवाईकांच्या घरी स्थलांतर करणेत आले आहे. सदर स्थलांतर हे पूर्ण झाले असून तेथे आपत्कालीन व्यवस्थापनाने खबरदारीची उपाय योजना करणेत आलेली आहे.


गावातील लोकांना सर्तकतेचा इशारा देणेत आलेला आहे..
या घटनेची त्वरीत दखल घेत तहसिलदार अमृता साबळे, गटविकास अधिकारी भरत चोगले. पोलिस निरीक्षक उदय पोवार यांचे सह माजी आम. सुभाष बने यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून तातडीने स्थानिकांना स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाच्या मदतीने उपाय योजना केली असलेने गावकरऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
आजही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने त्या परिसरात भेगा पडून भुस्खलन होत पडझड होण्याची शक्यता आहे..

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE