संगमेश्वरच्या पैसा फंडची प्रांजल गुरव गुणवत्ता यादीत

संगमेश्वर : व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय संगमेश्वरची विद्यार्थीनी प्रांजल प्रमोद गुरव ही आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आल्याने प्रशालेतर्फे तिचा आज संस्था सचिव धनंजय शेट्ये यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .

आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या प्रांजल प्रमोद गुरव या विद्यार्थीनीचा सन्मान करताना संस्था सचिव धनंजय शेट्ये , सोबत पर्यवेक्षक दिलीप मोरगे आणि शिक्षकवर्ग

इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आपण कठोर परिश्रम केले त्याबरोबरच प्रशालेतील शिक्षकांनी जादा तास घेऊन वेळोवेळी जे मार्गदर्शन केले त्यामुळेच आपण हे यश मिळवू शकलो असे प्रांजलने सांगितले . प्रांजलच्या यशाबद्दल तिचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये , उपाध्यक्ष किशोर पाथरे , सदस्य संदीप सुर्वे , रमेश झगडे , मुख्याध्यापक सचिनदेव खामकर , पर्यवेक्षक दिलीप मोरगे आदींनी अभिनंदन केले आहे .

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE