रत्नागिरी : शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरीला भेट दिली.
दि. ४ ऑगस्ट हा दिवस मत्स्य महाविद्यालय शिरगाव, रत्नागिरीचा वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून तांत्रिक व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. या वर्षीही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. याचे निमित्त साधून डॉ. एन. पी. साहू, जॉइन्ट डायरेक्टर, केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, मुंबई आणि डॉ. आर.ए. श्रीपादा, वरिष्ठ प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय समुद्री संस्था, गोवा यांनी विशेष उपस्थिती लावली आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रम अध्यक्ष म्हणून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे होते. मत्स्य महाविद्यालयाची स्थापना आणि सुरुवात १९८१ रोजी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या पेठ्कील्ला येथील इमारतीमध्येच झाली होती. पुढे १९९३ पासून शिरगाव, रत्नागिरी येथील नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित झाले.

(सोबत डॉ. एन.पी. साहू, डॉ. प्रकाश शिनगारे, डॉ. ए.यू. पागारकर, श्री एन. डी. चोगले, डॉ. एस.वाय. मेतर, प्रा. सचिन साटम, प्रा. कल्पेश शिंदे.
जून महिन्यामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ दापोलीचा कुलगुरू पदाचा कार्यभार डॉ. संजय भावे यांनी स्वीकारला. त्यानंतर त्यांनी प्रथमच विद्यापीठ अंतर्गत असलेले सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी येथे भेट दिली. यावेळी संशोधन केंद्राच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी मा. आदरणीय कुलगुरू महोदय डॉ. संजय भावे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि खास मोमेंटो देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी कुलगुरू महोदय यांनी आपले विद्यापीठ सर्वोच्च स्थानी नेण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, मुंबईचे जॉइन्ट डायरेक्टर डॉ. एन. पी. साहू सुद्धा उपस्थित होते त्यांनी मत्स्यालय आणि संशोधन केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. त्यांनी संशोधन केंद्राच्या विविध महसूल प्रकल्प आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न याचा आढावा घेवून सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांची प्रशंसा केली. सदर कार्यक्रम प्रसंगी संशोधन केंद्र प्रमुख व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. प्रकाश शिनगारे आणि डॉ. ए.यु., प्राध्यापक स्टेज वर उपस्थित होते. यानंतर कुलगुरू महोदय डॉ. संजय भावे यांनी संशोधन केंद्राची नवीन तयार होत असलेली ईमारत, गेस्ट हाऊस, स्टाफ क्वार्टर्स यांची पहाणी केली. सदर कार्यक्रम संशोधन केंद्र प्रमुख व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. प्रकाश शिनगारे यांचे मार्गदर्शन खाली आयोजित करण्यात आला.
याकार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन करीता डॉ.ए.यु. पागारकर, प्राध्यापक; डॉ. हरीश धमगाये, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. नरेंद्र चोगले, प्रा. सचिन साटम, प्रा. कल्पेश शिंदे; अभिरक्षक डॉ. संतोष मेतर; वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्रीमती व्ही.आर.सदावर्ते; वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक श्री. आर.एम. सावर्डेकर; वरिष्ठ लिपिक श्रीमती जाई साळवी; लिपिक श्री सचिन पावस्कर; बोटमन श्री महेश किल्लेकर; तांडेल श्री मंगेश नांदगावकर, श्री दिनेश कुबल; मत्स्यालय यांत्रिक श्री मनीष शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. श्री सुहास कांबळे, श्री राजेंद्र कडव, श्री. मुकुंद देऊरकर, श्री सचिन चव्हाण, श्री प्रवीण गायकवाड यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन साटम यांनी केले.
