राजापुरात मध केंद्र योजनेबाबत जनजागृती मेळावा संपन्न


रत्नागिरी : राजापूर येथील नगरवाचनालयात मध केंद्र योजना/PMEGP/CMEGP योजने बाबत जनजागृती मेळावा घेण्यात आला.


राजापूर गट संस्थेचे अध्यक्ष सुनिल जठार यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी शैलेंद्र कोलथरकर हे प्रमुख मार्गदर्शक होते. जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक हरिभाऊ आंधळे, तालुका कृषी अधिकारी विद्या पाटील, प्रगतशील मधपाळ मिलिंद गाडगीळ, आनंद चौधरी ,संदीप माने, उद्योग निरीक्षक आकाश म्हेत्रे, तसेच शेजवली ग्रामपंचायतचे सरपंच मंदार राणे आदी उपस्थित होते.

या मेळाव्यास तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार व नव उद्योजक तसेच मधमाशापालन व्यवसाय करू इच्छिणारे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच मधाच्या गावाबाबत संगमेश्वर तालुक्यातील मु.देवडे पो.साखरपा येथे देवडे व किरबेट येथील सरपंच, ग्रामस्थ व मधपाल याची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतील सकारात्मक प्रतिसाद पहाता या बैठकीत मधाचे गाव करण्याबाबत पुढील नियोजन व रूपरेखा ठरवण्यात आली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE