उरण दि १४ (विठ्ठल ममताबादे ) : उरण न्यायालयामधे वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापनेसाठी कार्यकारिणीचे सभेत ठराव मंजुर करून तो जिल्हा न्यायालय अलिबाग यांच्याकडे पाठविण्यात आला होता. जिल्हा न्यायालय अलिबाग यांनी हा प्रस्ताव उरण न्यायालयाचे पनवेल येथील वरिष्ठ न्यायालयामधे चालविले जाणारे सर्व दिवाणी अर्जाची व दाव्याची माहिती मागवून उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविला आहे, अशी माहिती अँड.दत्तात्रेय नवाळे यांनी दिली.
![](https://digikokan.com/wp-content/uploads/2023/08/img-20230814-wa00268326138010309040201-1024x752.jpg)
उरण न्यायालयामधे लवकरच वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन होणार असल्याचे उरण वकिल संघटनेचे अध्यक्ष अँड. दत्तात्रेय नवाळे यांनी सांगितले. उरण तालुक्यातील रूपये पाच लाख रक्कमेच्या वरील दिवाणी दाव्यामधील पक्षकार आणि त्यांचे वकिल यांना पनवेल येथे येण्या-जाण्या करता होणारा त्रास वाचवण्याकरता उरण येथे वरिष्ठ न्यायालय स्थापन होणे गरजेचे झाले आहे. पनवेल येथील वरिष्ठ न्यायालयामधे उरण, पनवेल, कर्जत व खालापुर येथील ४ न्यायालयांचे दिवाणी दावे, दिवाणी अर्ज, भुसंपादनाचे अर्ज यांचे विषयी कामकाज चालत असते. त्यामधे अधिकाअधिक काम उरण तालुक्यामधुन आलेले असते. पनवेल येथे जाणे येणे करता संबंधीत वकील व पक्षकार यांना जवळ जवळ ५० कि.मी.चा प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रवासातच त्यांचा पैसा व वेळ वाया जातो व त्यामुळे त्यांची गैरसोय होते.
ही गैरसोय टाळण्याकरता उरण येथे वरिष्ठ न्यायालयाची स्थापना होणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन उरण न्यायालयाचे अध्यक्ष व त्यांचे कार्यकारीणीने उरण न्यायालयामधे वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापने करता कार्यकारीणीचे सभेमधे ठराव मंजुर करून सदरचा ठराव जिल्हा न्यायालय अलिबाग यांच्याकडे पाठविला. जिल्हा न्यायालय अलिबाग यांनी सदरचा प्रस्ताव उरण न्यायालयाचे पनवेल येथील वरिष्ठ न्यायालयामधे चालविले जाणारे सर्व दिवाणी अर्जाची व दाव्याची माहिती मागवुन उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे मंजुरी करता पाठविला आहे.
उरण येथे वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन करण्याकरता लागणारी दाव्याची संख्या पुरेशी असल्यामुळे नियमाप्रमाणे उच्च न्यायालय मुंबई सदरची बाब मंजुर करण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आता वकील व पक्षकार यांना पनवेल न्यायालयामधे जाण्याकरता लागणारा वेळ व पैसा वाचणार आहे.या करता उरण न्यायालयाच्या वकिल संघटनेचे अध्यक्ष अँड दत्तात्रेय नवाळे, उपाध्यक्ष अँड भारती भोईर, उपाध्यक्ष अँड किशोर ठाकुर,अँड. प्रसाद पाटील, सचिव अँड. अर्चना माळी, अँड प्रतिभा भालेराव, उपसचिव अँड. संतोष पाटील, लेखापरीक्षक तसेच अँड अझीमीन अन्सारी ,अँड वृषाली पाटील,अँड.विपुल ठाकुर, अँड धीरज डाकी सर्व सदस्य तसेच वरिष्ठ वकिल अँड एम.एम. मोकल,अँड मोहन थळी,अँड. भानुशाली वगैरे वकिलांनी मोलाचे सहकार्य केले आहे.