Konkan Railway | नेत्रावती, जामनगर एक्सप्रेसने प्रवास करणार आहात तर तुमच्यासाठी महत्वाचे

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर ते रत्नागिरी सेक्शन दरम्यान देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी ७.३० ते १०.३० असा तीन तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्या विलंबाने धावणार आहे. या गाड्यांमध्ये तिरुनेलवेली जामनगर तसेच मुंबईच्या दिशेने येणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेसचा समावेश आहे

कोकण रेल्वे मार्गावर घेण्यात आलेल्या या मेगाब्लॉकमुळे या कालावधीत या भागातून पास होणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. यामध्ये तिरुनेलवेली ते जामनगर एक्सप्रेस (19577) जिचा प्रवास 28 ऑगस्ट रोजी सुरू होतो ती गाडी कर्नाटकातील ठोकूर ते रत्नागिरी दरम्यान अडीच तास थांबवून ठेवले जाणार आहे. त्याचबरोबर तिरुअनंतपुरम सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी (16346) ही अप नेत्रावती एक्सप्रेस जिचा प्रवास 28 ऑगस्ट रोजी सुरू होतो ती ठोकूर ते रत्नागिरी सेक्शन दरम्यान सुमारे एक तास रोखून ठेवली जाणार आहे.

  1. हे देखील वाचा : Konkan Railway | दिवा- रत्नागिरी मेमू स्पेशल ट्रेनला आणखी दोन थांबे
  2. Konkan Railway | गणेशोत्सवात चिपळूणसाठी स्वतंत्र मेमू स्पेशल गाडी धावणार!
  3. Konkan Railway | गणेशोत्सवासाठी दिवा-रत्नागिरी मार्गावर यंदा प्रथमच मेमू स्पेशल धावणार!
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE