शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीचा उपक्रम
लांजा : शिवसेना महिला आघाडी उद्धव ठाकरे आणि शहर शिवसेना यांच्या वतीने मंगळागौरीच्या पारंपरिक नृत्याचा ‘श्रावणसरी’ हा खुल्या सादरीकरणचा कार्यक्रम मंगळवार दि. ५ सप्टेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने आमदार डॉ. राजन साळवी पुरस्कृत लांजा तालुक्यातील महिलांसाठी पारंपरिक झिम्मा फुगडी, मंगळागौर याचे सादरीकरण आहे.
यात सहभागी होण्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे. गटात कमीत कमी 6 महिला तर जास्तीत जास्त 12 महिला असतील. प्रवेशाचा अंतिम दिनांक 01 सप्टेंबर आहे. प्रवेशासाठी लीला घडशी, दीपाली दळवी, पूर्वा मुळे, छाया गांगण यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील गणेश मंगल कार्यालय आगरे येथे कार्यक्रम होणार आहे.
